कुतूहल न्यूज नेटवर्क
पुण्यातील ‘त्या’ पेंटिंगकडे पाहतच राहिले राज ठाकरे!
पुणे(Pune): आज पुण्यातील कात्रज येथील गुजर वाडी येथे राज ठाकरे यांच्या हस्ते युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटीचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन वसंत मोरे(Vasant more) यांनी केले होते. काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या जेम्स (James)या श्वानाचा मृत्यू झाला होता. जेम्सचे चित्र या प्रकल्पाच्या आवारातील शेडवर पाहून राज ठाकरे त्याला पाहतच राहिले.
याबाबत वसंत मोरे म्हणाले की, पुणे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त असून त्यामुळे नागरिकांना चावण्याच्या घटना अधिक प्रमाणात घडत आहे .त्या गोष्टीचा विचार करीता युनिव्हर्सल अँनिमल वेल्फेअर सोसायटीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यामध्ये कुत्र्यांवर उपचार आणि नसबंदी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Raj Thackeray kept looking at ‘that’ painting in Pune
hich tr rajsahebnachi olkh ahe