fbpx

पुलवामा चकमकीत बार्शी तालुक्यातील पानगाव येथील जवान शहीद

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी : जम्मू काश्मीर या खोऱ्यामध्ये पूलवामा विभागातील बंडजु या भागांमध्ये भारतीय जवान आणि अतिरेकी यांच्यात झालेल्या चकमकीत एक भारतीय जवान शहीद झाला असून तो जवान बार्शी तालुक्यातील पानगाव या गावातील आहे. सुनील काळे असे नाव या वीरमरण आलेल्या जवानाचे असून तो केंद्रीय राखीव संरक्षण दलांमध्ये कार्यरत होते. सुनील काळे हे शहीद झाल्याची बातमी बार्शी तालुक्यात पसरताच बार्शी शहरासह तालुकाभर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा-सहजीवन संस्थेतर्फे पांगरी येथील ग्रामीण रुग्णालयाला पीपीई किट देण्यात आले

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज पहाटे जम्मू काश्मीर येथे पुलवामा विभागात बंडजु या गावी काही अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळाली असता CRPF या दलाच्या एका तुकडीने बंडजु परिसर पाहणी करून अतिरेकी दबा करून बसलेल्या ठिकाणी घेराव केला असता अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात आणि भारतीय जवान यांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन अतिरेकी ठार मारण्यात या केंद्रीय राखीव संरक्षण दलाच्या तुकडीसह यश आले असून या झालेल्या चकमकीत एक भारतीय जवान शहीद झाला असल्याची माहिती आज सकाळी प्रशासकीय यंत्रणेने दिली. शहीद जवान काळे हे मूळ बार्शी तालुक्यातील गाव पानगाव येथील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *