fbpx

आरोग्य विभागाची रिक्त पदे भरण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला द्यावेत;आ.प्रशांत परिचारक

कुतूहल न्यूज नेटवर्क विजयकुमार मोटे

सोलापूर दि.25 : कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा काल सोलापूर दौरा झाला. प्रथम त्यांनी शासकीय रुग्णालयात भेट दिली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिकेचे आयुक्त आदी शासकीय अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेतली. या वेळी मा.श्री.आमदार प्रशांत परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकेला निधी उपलब्ध करण्याची मागणी केली .तसेच आरोग्य विभागात रिक्त जागेवर कंत्राटी पध्दतीने कर्मचारी भरती करण्यास स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्यात यावेत.नागरिकांची इतर आजरासाठी हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचारासाठी दाखल करून घेणे .महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळून देण्याच्या सूचना संबंधित हॉस्पिटलला देण्यात यावे अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी श्री.फडणवीस यांना केली.

हेही वाचा -पुलवामा चकमकीत बार्शी तालुक्यातील पानगाव येथील जवान शहीद

यावेळी खासदार डॉ.जयसिद्धेस्वर महास्वामी, श्री. खासदार रणजितसिंह निंबाळकर, श्री.आमदार सुभाषबापू देशमुख, .श्री.आमदार विजयकुमार देशमुख, श्री.आमदार राजाभाऊ राऊत, श्री. आमदार सचिनदादा कल्यांणशेट्टी, श्री.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,श्री. चेअरमन कल्याणराव काळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अनिरुद्ध कांबळे, जिल्हाध्यक्ष श्री.शहाजीभाऊ पवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *