कुतूहल न्यूज नेटवर्क :
गोरमाळे येथील स्थलांतरीत मजूर, विधवा महिला, अपंग यांना शिधा वाटप
पांगरी : डिजिटल सखी कार्यक्रम अंतर्गत एल अँड टी फायनान्सशियल सर्व्हिसेस, अफार्म संस्था पुणे व दिशा समाज विकास संस्था यांच्या वतीने बार्शी तालुक्यातील गोरमाळे येथील स्थलांतरीत मजूर, विधवा महिला, अपंग यांना शिधा वाटप करण्यात आले.

हेही वाचा-विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींस चौथ्यांदा केला वज्रलेप
या कार्यक्रम वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच उषा शिंदे,ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य बार्शी तालुकाध्यक्ष विष्णु पवार, सामाजिक कार्यकर्ते राहुल भड,पत्रकार इरशाद शेख, महिला बचत गट प्रतिनिधी शालन खळदकर, मंगल ताई, आंगणवाडी कार्यकर्ती सोनवणे मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबासाहेब वडवे क्लस्टर मॅनेजर यांनी केले व सूत्रसंचालन डिजिटल सखी धनश्री गाडेकर यांनी केले व आभार आकांक्षा खळदकर यांनी केले.