कुतूहल मीडिया ग्रुप
शिक्रापूर: पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथे वर्दळीच्या अशा पाबळ चौकामध्ये एक कार अचानक पेटल्याचा प्रकार घडल्याने येथे बर्निंग कारचा थरार पाहण्यास मिळाला. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसून कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ओव्हर हीटिंगमुळे ही कार पेटल्याचा अंदाज आहे.
शिक्रापूरात बर्निंग कारचा थरार
मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास शिक्रापूर येथील व्यापाराचे मुख्य ठिकाण असलेल्या पाबळ चौक येथे ही घटना घडली. एमएच १४ जीयु २५१७ या कारने अचानक पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला होता. वाहतूक पोलीस मिलिंद देवरे व ज्ञानेश्वर गोरे यांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना झाल्यावर पाण्याचा टँकर बोलवून गाडीवरील आग नियंत्रणात आणण्यात आली. पाण्याच्या टँकरसाठी संतोष शेंडे सुधीर रुके यांनी मदत केली. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.