कुतूहल न्यूज नेटवर्क-विजयकुमार मोटे
पंढरपुर चे माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांनी अशी केली वारी साजरी…
पंढरपुर दि.30 जुलै : आज दशमी आज वाखरी मधील पालखी तळावरुन सर्व पालख्या पंढरपुर कडे प्रस्थान करतात. त्यांचे इसबावी येथील विसावा मंदिरा जवळ इसबावीतील नगरसेवक स्वागत करत असतात.तसेच इथे उभे रिंगण सोहळा पार पडत असतो. परंतु या वर्षी कोरोनामुळे प्रत्येक वर्षी होणाऱ्या या सोहळ्याला मुकावे लागले आहे. प्रशासनाने देखिल सर्वांना नियम पाळून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले होते. हाच संदेश पाळून पंढरपुर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्री.विशाल मलपे व नगरसेवक श्री. सचिन शिंदे यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिली आहे.या दोघांनी मिळून आषाढी वारी मधील रथा मागील दिंडी क्र.९५ मधील वारकरी यांच्या घरी जाऊन घरातील देवाचं दर्शन घेतले. सोळंकी यांनी कोरोना मुळे वारी होत नाही याचे दु:ख वाटत आहे असे सांगितले. परंतु शासनाने वारी विषयी घातलेल्या नियमानुसार यावर्षी आपण वारी पार पडणार आहे असेही सांगितले. सर्वानी “आषाढी वारी , करु घरच्या घरी” हा संदेश देत प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती केली.