fbpx

बार्शीत कनफेडरेशन ऑफ फ्रि ट्रेड युनियन इंडीयाच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी दि.3 जुलै : भारत सरकारच्या कामगार निती धोरणाच्या विरोधात ३ जुलै रोजी सर्व कामगार संघटनाच्या वतीने देशव्यापी अंदोलन करण्यात आले . त्याचाच भाग म्हणून बार्शी येथे कनफेडरेशन ऑफ फ्री ट्रेड युनियन इंडीया या संघटनेचे नॅशनल एक्झकेटीव्ह मा . सत्यजित जानराव यांच्या मार्गदर्शनात मा . तहसिलदार बार्शी यांच्या द्वारे प्रधानमंत्री यांना निवेदन देण्यात आले . या निवेदनात कामगार कायद्यातील अंधाधुंद कारभार थांबवा,उदयोगधंद्याचे खाजगी करण थांबवा, कोरोना बाधीत असंघटीत कामगारांना तात्काळ १०,०००/- दया, अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या , संरक्षण, रेल्वे, दूरसंचार, पेट्रोलियम, इ क्षेत्रातील थेट गुंतवणूक थांबवा, कोळसा, ओएनजीसी, आईल इंडिया आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक थांबवा इ. मागण्या करण्यात आल्या आहेत .

हेही वाचा-बार्शी तालुक्यात कोरोनाचा विळखा वाढतोय, एकाच दिवसात 28 रूग्णांची वाढ

यावेळी नागनाथ सोनवणे, आत्माराम चव्हाण , पंडीत राजगुरु,अंगद गायकवाड, बाळासाहेब बंडलकर, सचीन ढाकणे, सुरेश चकोर,रामेश्वर सपाटे, प्रसाद पवार, मानकोजी ताकभाते, अमोल तिकटे, चकोर,युवराज चव्हाण, नागनाथ गोसावी, मुरली निकम, इत्यादी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *