कुतूहल न्यूज नेटवर्क
व्यायामशाळा इमारतिचा वापर इतर कामासाठी
बार्शी : गौडगाव ता. बार्शी येथील व्यायामशाळेची इमारत व्यायामशाळेसाठी न वापरता इतर कामाकरता वापरली म्हणून तालुका क्रीडा अधिकारी अनिल देशपांडे यांनी मुख्याध्यापक मल्टीपर्पज आदर्श न्यू इंग्लिश स्कूल गौडगाव यांना आपण शासनाची फसवणूक करत आहात म्हणून नोटीस बजावली आहे.
भास्कर जगन्नाथ काकडे यांनी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती बार्शी यांना लेखी तक्रार दिली होती की, “मल्टीपर्पज आदर्श न्यू इंग्लिश स्कूल गौडगाव या शाळेमध्ये गेले ३ ते ४ वर्ष झाले व्यायामशाळेची इमारत बांधली गेली आहे.व्यायामशाळेचा वापर शाळेतील विद्यार्थी व नागरिक व्यायाम करतील म्हणून शासनाने लाखो रुपये खर्च करून ही इमारत बांधलेली आहे.पण ती इमारत व्यायामशाळेसाठी न वापरता इतर आपल्या सोयीच्या कामासाठी वापरली जात आहे”.
त्यामुळे मल्टीपर्पज आदर्श न्यू इंग्लिश स्कूल गौडगाव या शाळेने क्रीडा विभागाची व शासनाची फसवणूक केली आहे,त्यामुळे ताबडतोब ती ईमारत विद्यार्थी व नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी, असे तालुका क्रीडा अधिकारी देशपांडे या नोटीसात म्हटले आहे.