कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी पोलीस ठाणे येथे सपोनि सचिन हुंदळेकर यांचा निरोप समारंभ
पांगरी : पांगरी पोलीस ठाण्यात दोन वर्षांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सपोनि सचिन हुंदळेकर यांची बदली नियंत्रण कक्षात केली आहे.त्यामुळे पांगरी ग्रामस्थांकडून श्री. हुंदळेकर यांना निरोप देण्यात आला.तर नविन नियुक्त झालेले सपोनि सुधीर तोरडमल यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी श्री हुंदळेकर म्हणाले की,मी पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकास न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.तसेच ह्या संपूर्ण कालावधीमध्ये सर्व नागरिकांचे,समाज सेवकांचे व पत्रकारांचे सहकार्य लाभले आहे.

यावेळी तात्या बोधे,ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य बार्शी तालुकाध्यक्ष विष्णु पवार,तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुहास देशमुख,बाळासाहेब मोरे,पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिरसाट,सचिन घावटे,चंद्रकांत गोडसे,पत्रकार इरशाद शेख,संगीता चांदणे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.