कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लढलेल्या अनेकांचा केला ग्रुपच्या वतीने सन्मान.
पंढरीत उद्योगपती निलेशभाऊ मुणगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
कुतूहल न्यूज नेटवर्क-विजयकुमार मोटे
पंढरपूर, 16 : मुंबई येथील एन एम इंटरप्रायजेसचे मालक आणि वास्तव्य ग्रुपचे सपोर्टींग पार्टनर उद्योपती निलेशभाऊ मुणगेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर येथे विविध उपक्रम राबविण्यात आले.

या उपक्रमात वरील ग्रुपच्या वतीने येथील क्रांतीसिह नाना पाटील चौक परिसरात असलेल्या मजूर वसाहतीमधील मुलाच्या हस्ते केक कापून शुभेच्छा दिल्या. याच वेळी त्या भागातील सर्व मुलांना फळे आणि खाऊ वाटप करण्यात आले.पंढरपूर येथे कोरोनाच्या या महामारीत महत्वाची भूमिका बजावत असलेल्या राबीन हूड आर्मीच्या जवानचा सन्मान वरील ग्रुपच्या वतीने करण्यात आला. त्या ठिकाणी वृक्षारोपण ही करण्यात आले.
सध्या डॉक्टरांनी जीव ओतून कोरोनाच्या परिस्थितीत महत्वाचे कार्य चालु ठेवले आहे. त्यामुळे त्यांचाही पी. पी.ई.किट, मास्क, फेसचिल्ड, सॅनीटायझर, देऊन सन्मान करण्यात आला. विविध हॉस्पिटल मध्ये जाऊन रुग्णांना फळे वाटप, आणि गरजूंना अन्नदान करण्यात आले. वरील सर्व उपक्रम राबविण्यासाठी एन एम इंटरप्रायजेस, वास्तव्य ग्रुपचे सर्व महिला आणि पुरुष यांनी परिश्रम घेतले.