fbpx

सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे मार्गदर्शनाखाली निर्मलग्राम ग्रामपंचायत वाडीकुरोली येथे होमिओपॅथीक गोळयांचे वाटप

कुतूहल न्यूज नेटवर्क-विजयकुमार मोटे

पंढरपूर दि.18 – कोरोना रोगाच्या प्रतिबंधासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे (camphor 1m) कम्फोरा 1 एम या होमिओपॅथीक औषधाचे वाटप सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळेसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली निर्मलग्राम ग्रामपंचायत वाडीकुरोली येथे मोफत करण्यात आले. 

याप्रसंगी होमिओपॅथीक तज्ञ डॉक्टर विजय पाटील, डॉ.विकास क्षिरसागर,यांच्यावतीने संपुर्ण गावातील कुटुंबांना या औषधाचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील, आबासाो काळे,बाबुराव काळे, निलेश काळे,ग्रामसेवक सावता शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते. 

यावेळी बोलताना कल्याणराव काळे म्हणाले की, रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी या औषधांचा संपुर्ण गावातील लोकांना फायदा होणार असून सर्वांनी योग्य दक्षता आणि आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविली तर आपण या महामारीवर मात करु शकतो .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *