कुतूहल न्यूज नेटवर्क-विजयकुमार मोटे
नगरसेवक विक्रम शिरसट यांच्या अप्रतिम कार्याचे प्रांताधिकारी ढोले यांचेकडुन कौतुक
पंढरपूर : पंढरपूर येथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा परस्थितीत बरेच भाग सील करण्यात आले आहेत. त्यातच प्रभाग क्रमांक ४ मध्ये ही काही रुग्ण आढळून आल्यामुळे हा भागही सील करण्यात आला आहे.या प्रभाग क्र.४ मधील गोविंदपुरा, अंबिकानगर परिसरात प्रांत अधिकारी सचिन ढोले आणि मुख्याधिकारी मानोरकर यांनी भेट दिली होती. यावेळी त्यांना या भागाचे नगरसेवक विक्रम शिरसट, आणि माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट यांनी अगोदरच या भागातील लोकांना योग्य प्रकारे सूचना देऊन संसर्ग वाढू नये यांची काळजी घेतली असल्याचे दिसून आले. यामुळे अशा या कर्तव्यतत्पर नगरसेवक विक्रम शिरसट यांच्या पाठीवर शाबासकी दिली आहे.