कुतूहल न्यूज नेटवर्क
शिराळे गावाच्या शिवारात सापडला अज्ञात पुरुषाचा मृत्यदेह
पांगरी दि.21 : शिराळे ता.बार्शी या गावाच्या शिवारातील केदारनाथ चौधरी यांच्या शेताच्या बाजूस असणाऱ्या ओढ्यामध्ये अनोळखी इसम वय अंदाजे 35-40 वर्षे मयत अवस्थेत मिळून आला आहे.
अधिक माहिती अशी की,पांगरी पोलिसांना खबर मिळताच सपोनि सुधीर तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिरसाट ,पोना मनोज जाधव व पोशि कोळी यांनी घटनास्थळी जावून मयताची पाहणी केली. मयत कुजलेले असल्याने डॉ.ढगे यांनी मयताचे जागेवरच पोस्टमार्टम केले.सदर मयताचा तपास पोना मनोज जाधव करत आहेत.