fbpx

बार्शी येथील नववीचा विद्यार्थी अवकाशामध्ये सोडणार पेडोल उपग्रह

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी : ७ फेब्रुवारी 2021 रोजी रामेश्वरम येथून डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनेशनल फाउंडेशनच्या वतीने भारतातून 1000 विद्यार्थ्यांकडून बनविलेले 100 पेडोल उपग्रह अंतराळात सोडण्यात येणार असून त्या विद्यार्थ्यांपैकी महाराष्ट्र विद्यालयातील इयत्ता ९ वीचा विद्यार्थी विवेक विलास मांजरे यांची निवड झाल्याबद्दल पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर  उकिरडे यांनी त्याचा सत्कार केला.

याप्रसंगी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सांस्कृतिक विभागाचे चेअरमन जयकुमार शितोळे, सोलापूर जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी अशोक भांजे, पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मण जाधव, नगरपालिका शिक्षण विभाग पर्यवेक्षक संजय पाटील, प्राचार्य डी.बी.पाटील उपप्राचार्य एल.डी.काळे, एम.एस शेळके, पी.पी.पाटील, जि.ए.चव्हाण, एस.बी बागल, व्हि.जे.देशमुख, ए.एन कसबे , अतुल नलगे हे उपस्थित होते. या यशासाठी त्याला विद्यालयाचे प्राचार्य डी.बी.पाटील व विज्ञान शिक्षक संग्राम देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

जगात सर्वात कमी वजनाचे (25 – 80 ग्रँम) उपग्रह 35000 ते 38000 मीटर उंचीपर्यंत सोडण्यात येणार आहेत या उपक्रमाची नोंद जागतिक विक्रम, आशिया विक्रम, इंडिया विक्रम यामध्ये केली जाणार आहे. यावेळी विवेक मांजरेला पुढील कारकिर्दीसाठी सर्व संस्था पदाधिकारी सर्व सदस्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *