fbpx

बार्शी-सोलापूर रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात पडून ऊस वाहतुकीचा ट्रॅक्टरचालक ठार

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी : बार्शी-सोलापूर रस्त्यावर सुरु असलेल्या कामामध्ये रस्त्यात खोदलेल्या खड्ड्यात पडून ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरचा चालक ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. महावीर वसंत जमदाडे (वय ३८ ) रा. पानगाव ता बार्शी असे मयताचे नाव आहे. मयत जमदाडे हा कुटुंबातील एकमेव कमवता होता. त्याच्या पश्चात आई वाडील लहान भाऊ, पत्नी व दोन लहान मुले आहेत. कंत्राटदाराने वाहतूक वळविल्याबाबत कोणताही फलक न लावता केलेल्या हलगर्जीपणामुळे त्याचा बळी गेला. रस्ता सुधारणेच्या कामात वाहतुकीला सावध करणारे योग्य ते फलक न बसविल्यामुळे या परिसरात अपघातात गेलेला हा दुसरा बळी आहे.

पानगाव येथील सदा गाडे यांच्या ट्रॅक्टर इंद्रेश्वर कारखाण्यासाठी ऊस वाहतूक करत आहे. महावीर जमदाडे हा या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होता. काल संध्याकाळी तो परिसरातील शेतांमधून ऊस घेऊन दोन ट्रॉल्या भरून कारखान्याकडे निघाला होता, सौदरे ते बार्शी दरम्यान घोरओढयाजवळ रस्ता सुधारणेच्या कामानिमिताने रस्त्यात मोठमोठाले खड्डे करण्यात आले आहेत. तेथून वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र, कंत्राटदाराने तेथे वाहतूक वळविल्याबाबत अंधारातही सहज दिसणारे फलक बसविलेले नाहीत. केवळ लोखंडी पत्रे ठोकलेले आहेत ते अंधारात सहज दिसत नाहीत, समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रकाशझोत डोळ्यांवर पडल्यास चालकाला अंदाजानेच वाहन चालवावे लागते. त्यामुळे महावीर जमदाडे याला अंधारात ड्रायव्हरशनचा अंदाज आला जाही. त्यामुळे तो हेडसह रस्त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडला, यावेळी मागील ट्रॉलीचे वजन हेडवर आल्याने त्या चालकाचा दबून जागेवरच मृत्यू झाता. दोन ट्रॉलीतीत उसाचे वजन खूप असल्यामुळे त्यांना काही करता आले नाही. त्याला बाहेर काढण्यासाठी प्रथम जेसीबी नंतर क्रेन बोलवावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *