कुतूहल न्यूज नेटवर्क : प्रतिनिधी आसिफ मुलाणी
कारीत विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू
कारी दि.08 सप्टेंबर : उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील युवक रणजित कुमार येडवे वय 28, यांचा काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विजेचा शॉक लागून मृत्यू झाला.कारी गावात त्यांचे इलेक्ट्रिक दुकान होते त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज दुपारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
“रणजित चा स्वभाव अतिशय मनमिळाऊ, सर्वांशी प्रेमाने वागणारा, सतत हसरा चेहरा आज सर्वांना सोडून गेला“
संजित डोके ,तंटामुक्त समिती अध्यक्ष
“काल रात्री रणजित च्या बाबतीत घडलेली घटना ह्रदय पिळवटून टाकणारी ,मनाला चटका देणारी आहे विजेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या युवकाचा विजेनेच घात केला.”
प्रदीप चव्हाण,शिक्षक