fbpx

गुळपोळीत शिवजयंती निमित्त आधार कार्ड शिबीर संपन्न

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी : बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील महामानव बहुद्देशीय सामजिक संस्था व भारतीय डाक विभाग बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने गुळपोळी येथे शिवजयंती निमीत्त आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे व ऑल जर्नालीस्ट अँड फ्रेंड्स सर्कलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेश गोडसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .कार्यक्रमाचे अध्यक्ष डाक विभागाचे उपविभागीय अधिकारी अमित देशमुख तर प्रमूख उपस्थित बार्शी पंचायत समितीचे सदस्य इंद्रजित चिकणे,  शिरीष चिकणे, कृष्णा चिकणे, कैलास नाना माळी, ग्रा. पं. सदस्य अमोल नरखडे, अखिल भारतीय नाथ पंथी डवरी गोसावी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष संजय चव्हाण, माजी सरपंच दत्तात्रय काळे तंटामुक्त समिती अध्यक्ष गणेश चिकणे,  ग्रामसेवक वैभव माळकर,  तलाठी रावसाहेब देशमुख , पोलीस पाटील बाळकृष्ण पिसे उपस्थित होते.

सपोनि शिवाजी जायपत्रे व पत्रकार गणेश गोडसे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांचा पुस्तक गुलाब देवून सत्कार करण्यात आला. या शिबिरामध्ये नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड मध्ये दुरुस्ती करणे तसेच पोस्ट विभागाच्या विविध योजनांची माहिती उपविभागीय अधिकारी अमित देशमुख यांनी दिली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी, नितीन पाटील, किरण खुरंगळे, गणेश लंगोटे, शिरीष चिकणे, कृष्णा चिकणे, गुलाब शेख, योगेश चिकणे, प्रसाद पाटील, बाळकृष्णा पिसे, गणेश चिकणे, उल्हास सुतार, गणेश लंगोटे, प्रणाली प्रबंधक माधव बारसकर, पंजाबराव कराड, दिपक काकडे, डाक आवेक्षक रविंद्र बगाडे, अजित नडगिरे, घनश्याम क्षिरसागर, लक्ष्मण काळे, प्रतिक वैद्य, ज्ञानेश्वर काळे, लक्ष्मण घेवारे, कल्याणी पाटील, परमेश्वर माचले ,दत्तात्रय चौधरी, लखन चौधरी, संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ बार्शी पोस्ट ऑफिसचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन भैरवनाथ चौधरी तर आभार नितीन पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *