आराध्या गुळवे हिने स्केटींगमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याबद्दल तिचा ठिक ठिकाणी सन्मान केला जात आहे.
कुतूहल न्यूज नेटवर्क बार्शी: बाशी येथील सिल्व्हर ज्युबिली प्रशालेत इयत्ता पहिलीत शिकत असलेल्या आराध्या गुळवे हिने स्केटींगमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
औरंगाबाद येथे रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने राज्यस्तरीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्यानंतर गोवा येथे दि. ०४ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन दुसरा क्रमांक पटकाविला. तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही यश संपादन करून मलेशिया येथे होणाच्या आंतरराष्ट्रीय स्केटींग स्पर्धेत आराध्या गुळवे हिची निवड झाली आहे.
परंडकर बृहन्मठाचे राचलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते आराध्या हिला गौरविण्यात आले. यावेळी रामलिंग गुळवे, मंगल गुळवे, अनिल बेणे, विवेक वायकर, जयंत हिंगमिरे, उमाकांत बुगडे, प्रभुलिंग स्वामी, प्रभाकर गुळवे, सागर गुळवे आदी उपस्थित होते. आराध्या हिला गणेश रोडे व भगवान जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.