दयानंद गौडगांव : कुतूहल न्यूज नेटवर्क
नवले पुलाजवळ भीषण अपघात ; एक ठार तर चारजण गंभीर जखमी
पुणे प्रतिनिधी, दि.२९ नोव्हेंबर : पुण्यातील नवले पुलाजवळ आज संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. मुंबई बेंगलोर महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ह्या ट्रकने समोरच्या पाच ते सहा वाहनांना जोरदार धडक दिली. यामध्ये एकाचा मृत्यू तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातामध्ये काही चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा समावेश आहे. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर चार जण गंभीर जखमी आहेत. यातील तीन वाहनांचा तर अक्षरशः चुराडा झाला आहे.
अपघाताची माहिती मिळतात सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातामुळे मुंबई बँगलोर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली असून पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढली. तसेच वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने नवले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.