fbpx

रस्त्याने जाणाऱ्या महिलेस जबरदस्तीने उचलून नेवून मारहाण करून बलात्कार व जबरी चोरी करणारे आरोपी 24 तासात जेरबंद

कुतूहल न्यूज नेटवर्क

सोलापूर:  दिनांक 18 एप्रिल 2020 रोजी रात्री 08.30 वा. च्या दरम्यान यातील महिला फिर्यादी ही तिच्या ॲक्टीवा मोटार सायकलवरून सोलापूरहून कारंबाकडे जात होत्या. त्यांची मोटार सायकल ही कारंबा गावाजळील पेट्रोल पंपाजवळील भोगाव गावाकडे जाणारे कच्या रस्त्यालगत आली असता फिर्यादीच्या गाडी पाठीमागून बुलेट मोटार सायकलवरून तीन इसम आले. त्यांनी फिर्यादीच्या मोटार सायकलला बुलेट मोटार सायकल आढवी लावून थांबवले.  तिला तेथे मारहाण करून मोटार सायकलवरून भोगाव रोडला घेवून जावून तेथे रस्त्याच्या कडेला असणारे शेतामध्ये घेवून तिच्या कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिणे काढून घेतले. तसेच फिर्यादी हीस मारहाण करून तिचेवर त्याच्यातील एकाने बलात्कार केला. त्यानंतर फिर्यादीस तेथेच सोडून निघून गेले होते. सदरबाबत सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता.

सदर गुन्ह्यामध्ये यातील महिला फिर्यादी हीस तीन इसमांनी मारहाण करून, अंगावरील सोन्याचे दागिणे काढून बलात्कार केल्याने सदरचे प्रकरण हे गंभीर होते. यातील आरोपी हे अनोळखी असल्याने सदर आरोपींना निश्पन्न करून गुन्हा उघडकीस आणनेकामी तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सर्जेराव पाटील यांना सदरचा गुन्हा लक्ष घालून उघडकीस आणनेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोनि सर्जेराव पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांची तपास पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली होती. सदरचा गुन्हा हा सोलापूर शहरालगत घडला असल्याने व फिर्यादीने आरोपींचे दिलेले वर्णन व त्यांचेकडील बुलेट मोटार सायकलचे वर्णन यावरून तपास पथकाने तपासाची चक्रे फिरवली. त्यामध्ये सदरचा गुन्हा देगाव येथील राहणारे मुलाने त्याचे मुंबई येथून आलेल्या मित्रासह केला असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पोलीस हवालदार राजेष गायकवाड यांच्या पथकाने सदर मुलाची माहिती काढून त्याचा षोध घेण्यास सुरूवात केली परंतू देगाव येथील आरोपी हा तुळजापूर रोडने गेल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तपास पथकाने तुळजापूर रोडला सदर आरोपींचा शोध घेतला असता तिन्ही आरोपी मिळून आले. त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या बुलेट मोटार सायकल क्रमांक एम.एच.12 टी/7388 सह ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे कौषल्यपूर्ण तपास करता त्यांनी फिर्यादी महिलेकडून मारहाण करून काढून घेतलेले सोन्याचे दागिणे देखील मिळून आले. त्यांचेकडून गुन्ह्यातील गेला माल व बुलेट मोटार सायकल असा एकूण 1,30,000/- मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यातील देगाव येथील राहणारा आरोपी हा विधीसंघर्शग्रस्त बालक असून त्याच्यावर सोलापूर शहरामध्ये चोरी, घरफोडी, जबरी चोरी यासारखे एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याचे मुंबई येथून आलेल्या सह आरोपीपैकी एक आरोपी देखील विधीसंघर्शग्रस्त बालक आहे. त्या दोघांनी मुंबई येथून सोलापूरकडे येत असताना बुलेट मोटार सायकल क्रमांक एम.एच.12 टी/7388 ही पुणे येथून चोरी करून आली असल्याची माहिती त्यांनी तपासा दरम्यान दिली आहे. त्यांचेविरूध्द देखील मुंबई येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती समजून आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे याचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली पोह राजेश गायकवाड, पोह विजय भरले, पोह दिलीप राउत, पोना हरीदास पांढरे, पोना रवी माने, पोकाॅ सचीन गायकवाड, मपोकाॅ सरस्वती सुगंधी सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण व सायबर पोलीस स्टेशनचे पोकाॅ अन्वर आत्तार यांनी बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *