कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: खून प्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या व पाच वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
खूनातील आरोपी पाच वर्षानंतर गजाआड
याबाबत अधिक माहिती अशी की वसंत बाबु मांजरे(रा. देवगाव (मां) ता. बार्शी) यांने दि ०२ ओक्टोंबर २०१७ रोजी देवगाव (मां) येथे भालेराव वस्तीजवळ धर्मराज विठ्ठल मांजरे (रा. देवगाव (मां), ता. बार्शी) यांना आरोपी यांने टॉवेलमध्ये दगड बांधून डोक्यात मारून जखमी करून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकुन पेटवून दिले व उपचारादरम्यान धर्मराज विठ्ठल मांजरे हे मयत झाले. त्यादिवसापासून वसंत बाबु मांजरे हा पुणे, आळंदी, जेजुरी, सातारा या ठिकाणी राहून वेश बदलून पोलीसांना गुंगारा देत होता.
बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि शिवाजी जायपत्रे यांना वसंत मांजरे हा लोणंद (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे असल्याचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. उपविभागीय अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने जाऊन लोणंद गावच्या शेजारी पाडळी गावच्या शिवारात, महादेव नगर येथे आरोपी यास ताब्यात घेतले आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वीनी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर, बार्शी तालुका पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सपोनि शिवाजी जायपत्रे यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना. अमोल माने, धनराज फत्तेपुरे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे रतन जाधव यांनी ही कामगीरी केली. सदर आरोपीस पुढील कारवाईकरीता पांगरी पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount