fbpx

उपळाई (ठोंगे) येथे जुगार अड्डयावर छापा टाकून सात जणांवर कारवाई

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी : बार्शी तालुक्यातील उपळाई (ठोंगे) येथे जुगार खेळणाऱ्या सात जुगाऱ्यांवर बार्शी तालुका पोलीसांनी कारवाई करत मुद्देमाल जप्त केला.दि. २१ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास ही कारवाई झाली. याप्रकरणी पोलीस अंमलदार विजय घोगरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 

रोहीत तानाजी बाशींगे (वय 30 वर्षे, रा कसबा पेठ संकेश्वर उद्यान बार्शी), मुकेश अंबऋषी भोरे (वय 32, वर्षे रा कसबा पेठ), रमेश विश्वनाथ पवार (वय 38, वर्षे रा सुभाष नगर बार्शी), महेश चंद्रकांत पवार (वय 28 वर्षे, रा एकविराई चौक बार्शी), लक्ष्मण खंडू वाघ (वय 52, वर्षे रा मंगळवार पेठ बार्शी), तकबिर हीदायत पठाण (वय 53, वर्षे रा अमन चौकाचे पाठीमागे बार्शी), अमोल विलास गुरव (रा.बारगुळे प्लाॅट बार्शी ) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

उपळाई ठोंगे हद्दीतील कॅनलचे कडेला गव्हाणे फार्मचे पश्चिमेस 1 की मी अंतरावर शेतात लिंबाचे झाडाखाली कांही इसम जुगार खेळत आहेत अशी बातमी पोलिसांना मिळताच छापा टाकला असता काही इसम गोलाकार बसून पैशाची पैज लावुन पत्त्याचे सहायाने जुगार खेळत असल्याचे दिसले. याबाबत विचारणा केली असता लक्ष्मण वाघ याने ते सदर ठिकाणी मन्ना नावाचा जुगार पत्याचे सहायाने खेळत असलेचे सांगून सदर जुगार अड्डा महेश चंद्रकांत पवार व लक्ष्मण खंडु वाघ असे दोघेजण चालवत असलेचे त्यांनी सांगितले. तसेच आम्ही कोणाची परवानगी न घेता अगर कोणास न विचारता या लींबाचे झाडाखाली जुगार खेळत असल्याचे सांगीतले. जुगार खेळताना त्यांचेकडे रोख रक्कम, मोबाईल व इतर जुगाराचे साहित्य असे एकुण 41,680/-रु. किमतीचा मुददेमाल मिळून आला. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, खांडवी बीट हद्दीत सहायक फौजदार पी जे जाधव, पो कर्मचारी भांगे, बोंदर, धुमाळ यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *