पांगरी : कुतूहल न्यूज नेटवर्क पांगरी ता बार्शी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी रोज भरणारी भाजी मंडई उद्या बुधवार दि.8 रोजी सकाळी 8 ते 10 वाजता सुरू राहील.पांगरी ग्रामपंचायत कडून लिपिक उमेश गाढवे व शिपाई मधुकर राऊत यांनी विक्रेतेसाठी सोशल डिस्टन्स ठेवून चौकोण आखून दिले आले आहेत .विक्रेत्यांनी याच चौकोणात बसावे व विक्रेते आणि ग्राहक यांनी तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधणे आवश्यक आहे,असे न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल,असे ग्रामसेवक संतोष माने यांनी सांगितले आहे.विनाकारण जर कोणी मंडईत फिरताणा आढल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी सांगितले आहे.