कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी येथील पुरोगामी विचार मंचच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक व शैक्षणिक उल्लेखनीय कार्य केल्यामुळे ॲड. रियाज बागवान यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बार्शी येथील ॲड. रियाज बागवान पुरस्काराने सन्मानित
हा कार्यक्रम बार्शीतील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. चंद्रकांत मोरे, ज्येष्ठ विचारवंत व लेखक काँ.प्रा.तानाजी ठोंबरे, भारतीय आजाद कामगार महासंघाचे जनरल सेक्रेटरी सी.बी. गंभीर, पुरोगामी विचार मंचचे अध्यक्ष रमेश गवळी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
(Adv. Riaz Bagwan honored with the award)