पांगरी प्रतिनिधी : कुतूहल न्यूज नेटवर्क
कृषी कन्येनी पटवून दिले शेतकरी ॲपचे महत्व
पांगरी : कृषी महाविद्यालय उदगीर येथील विद्यार्थ्यांनी प्राजक्ता बाळासाहेब मोरे हिने शेतीसाठी उपयुक्त विविध ॲपचा वापर या बाबत पांगरी (ता.बार्शी) व परिसरातील शेतकऱ्यांना माहिती दिली.

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी आधारीत औद्योगिक कार्यक्रम अंतर्गत विविध ॲपद्वारे किसान योजना,मार्केट यार्ड किसान,इफको किसान,ॲग्री ॲप याचा वापर कसा करावा याची सविस्तर माहिती दिली.