कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: शेतीचा वीजपुरवठा बंद केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता सुर्डी वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा भैरवनाथ शेतकरी व शेतमजूर संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
वीज वितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा शेतमजूर संघटनेचा इशारा
गत दोन वर्षापासून कोरोना महामारी व अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता शेतीपंपाच्या वीजबिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा बंद करण्यात येत आहे. यंदा पाउस चांगला झाला असल्याने पिकाना पाणी देउन ते जगविण्याची धडपड शेतकरी करत आहे. मात्र वीज तोडल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही.
कोरोना महामारी काळात सर्वच धंदे बंद पडले पण शेतीने देशाच्या अर्थव्यवस्थेला आधार दिला. तरीही शासनाचे हे धोरण अन्यायकारक आहे. वीज कंपनी शेतीसाठी किती तास वीज पुरवठा व पुरविलेल्या विजेच्या दर्जाबाबत काहीच जबाबदारी घेत नाही. पण वीज तोडणीसाठी आग्रही असते, शेतीसाठी वीज बेभरवशाची आहे. वीजबिलात लुट केली जात आहे, शेतीपंपाला वीज पुरववली म्हणून अनुदान पदरात पाडून घेण्यासाठी सबसिडी वसूल केली जात आहे, हे सिध्द झाले आहे.
शेतीला प्रत्यक्षात चारच ते आठ तास वीज मिळते, तिही कमी दाबाने अशा स्थितीत शेतकरी वीजबिल कसे भरणार? पिकासाठी केलेला खर्चही शेतातून निघत नाही, शेतीमालाचे भाव काढताना उत्पादन खर्चात वीजबिल धरले जात नाही. या बाबींचा विचार करता वीजबिल वसुली थांबवावी, शेतीपंपाचे कनेक्शन तोडू नये अन्यथा सुर्डी सबस्टेशन समोर बेमुद धरणे आदोलन करण्यात येईल. भैरवनाथ शेतकरी व शेतमजूर संटना पश्चिम महाराष्ट्र चे अध्यक्ष सूर्यकांत चिकणे व प्रवीण डोके, रेखा चिकणे यांनी निवेदन सादर केले निवासी नायब तहसीलदार संजिन मुंढे यांनी निवेदन स्वीकारले.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount