कुतूहल न्यूज नेटवर्क
मळेगाव येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
मळेगाव : मळेगाव ता.बार्शी येथे श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे झाला. अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गाव. अहिल्यादेवी होळकर ह्या एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या त्या उत्तम प्रशासक देखील होत्या. अहिल्यादेवी होळकर ह्या राजकीय दृश्यपटलाच्या एक सूक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या. कोणतेही प्रकरण आहिल्यादेवीच्या निदर्शनास आले की ते कडकपणे हाताळले जाई. आहिल्यादेवींना आपल्या प्रजेचा उत्कर्ष आवडत असे, ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे जसे पुरुषा मधील उत्तम राजे होते. तसेच अहिल्यादेवी ह्या स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्त्या होत्या, सर्वप्रथम अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन जोती संजयकुमार माळी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी, पोलीस पाटील ज्ञानेश्वर माळी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलावर शेख, मंडळाचे बंडू पाडुळे, आजीनाथ गाडे, माजी ग्रा.प.सदस्य श्रीमंत पाडुळे, माजी प्राचार्य महारुद्र गडसिग, सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी, बार्शी पोलीस स्टेशनचे संताजी आलाट, ग्रा.प.सदस्य पूजा इंगोले, सुजाता पाडुळे, ग्रामपंचायत क्लार्क सुरेश कांबळे, संगणक परिचालक प्रशांत पटणे आदी मान्यवर उपस्थित होते.