fbpx

मुंबई : हवाईसुंदरीचा संशयास्पद मृत्यू

मुंबई : कुतूहल न्यूज़ नेटवर्क

विलेपार्ले येथील पोद्दार वाडीमध्ये राहणाऱ्या एका हवाईसुंदरीचा तिच्याच घरात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बुधवारी रात्री आढळला. सुलताना शेख असे या हवाईसुंदरीचे नाव असून ही आत्महत्या असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.हे वृत्त महाराष्ट्र टाइम्स.काॅम ने प्रकाशित केले आहे.

पोद्दार वाडीतील राजलक्ष्मी अपार्टमेंट या इमारतीमधील एका फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी बुधवारी रात्री पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता सुलताना मृतावस्थेत आढळली. सुलताना दोन सहकाऱ्यांसोबत या ठिकाणी वास्तव्यास होती. मात्र दोघीही लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच आपापल्या घरी निघून गेल्या. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याची शक्यता असली तरी मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. घटनास्थळी चिठ्ठी अथवा लिखीत स्वरुपात काहीही आढळले नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *