सरचिटणीसपदी दिनेश मेटकरी तर उपाध्यक्षपदी ईरशाद शेख
बार्शी डिजिटल मिडीया संपादक-पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी अजय पाटील
कुतूहल न्यूज नेटवर्क :
बार्शी : महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडीया संपादक-पत्रकार संघटनेच्या बार्शी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम मातृभूमी हॉल येथे पार पडला. राज्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि डिजिटल संपादक-पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. त्यावेळी, बार्शी टाइम्सचे संस्थापक आणि लोकमत डिजिटलचे उपसंपादक मयूर गलांडे हेही उपस्थित होते.
राजा माने हे मूळ बार्शीपुत्र असल्याने त्यांच्याहस्ते आणि प्रमुख उपस्थितीतच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यावेळी बोलताना, बार्शी ही माझी जन्मभूमी आहे. त्यामुळे, येथील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करताना मला अत्यानंद होत आहे. महाराष्ट्रात संघटनेचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असून लवकरच आपण पहिले अधिवेशन भरविणार आहोत, असे माने यांनी सांगितलं. तसेच, या संघटनेच्या माध्यमातून विधायक कार्याला गती देऊन सर्वसामान्यांचा आवाज बनण्याची जबाबदारी तुमच्यावर असल्याचंही ते म्हणाले. तर, बार्शी तालुका अध्यक्ष अजय पाटील यांनीही संघटनेच्या कार्याला गती देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन आणि आपल्या मार्गदर्शनातच काम करेल असे आश्वासन दिले. यावेळी, विनोद ननवरे यांना सोलापूर जिल्हा सहसचिव पदाची जबाबदारी देण्यात आली. तर, विजय कोरे यांना जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यपदी नियुक्त करण्यात आले आहे.
बार्शी तालुका डिजिटल मिडिया संपादक-पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी अजय पाटील, सरचिटणीसपदी दिनेश मेटकरी, उपाध्यक्षपदी इरशाद शेख, उपाध्यक्ष ग्रामीणपदी बलभीम लोखंडे, सहसचिवपदी धीरज शेळके आणि खजीनदारपदी आमीन गोरे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छाही देण्यात आल्या.