fbpx

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंडस सर्कल’च्या केंद्रीय अध्यक्षपदी गणेश कोळी तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी झुल्पिकार काझी यांची निवड

कुतूहल न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंडस सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी गणेश कोळी (पनवेल) यांची तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी झुल्पिकार काझी (परांडा) यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल (रत्नागिरी) यांनी या निवडी जाहीर केल्या आहेत.

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंडस सर्कल ही पत्रकार आणि पत्रकार मित्रांची राष्ट्रीय संघटना असून महाराष्ट्र राज्यासह देशभरात ही संघटना गेल्या एक तपाहून अधिक काळापासून कार्यरत आहे. राज्याचे पहिले प्रदेश संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल यांनी मोठ्या कष्टाने ही संघटना राज्यभर बांधली.आतापर्यंत राज्यात गणपतीपुळे, मिरज, सांगोला, मुंबई, पुणे, अमरावती, कराड यांसह विदर्भ, मराठवाड्यात पत्रकार संमेलने पार पडली आहेत. यानिमित्ताने पत्रकारांचे अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्याचबरोबर राज्यातल्या विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या संघटनेच्या विश्वस्त बैठकीत या निवडी करण्यात आल्या आहेत. यासीन पटेल, युयुत्स आर्ते, विकास कुलकर्णी ,गणेश गोडसे, अतुल होनकाळसे आदींच्या विश्वस्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. श्री. कोळी आणि श्री. काझी यांना निवडीची पत्रे देण्यात आली आहेत. श्री. कोळी म्हणाले की, पत्रकारांच्या प्रश्नांसाठी आपण सतत कार्यरत असून यापुढेही अधिक जोमाने प्रयत्नशील राहणार आहे. देशात संघटना आणखी बळकट करण्यासाठीही प्रयत्न केले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *