कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे बीए भाग 3 मध्ये संगीत विभागात शिकत असलेली विद्यार्थिनी कुमारी आकांक्षा आनंदकुमार देशपांडे हिने मुंबई येथील इंडियन म्युझिक थेरपी असोसिएशनचे मेंबर डॉक्टर संतोष घाटपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संगीत उपचार व ॲडव्हान्स संगीत उपचार हे दोन्ही कोर्स पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे आकांक्षा देशपांडे ही विविध आजारावर संगीत उपचार करू शकते बार्शी मध्ये व ग्रामीण भागात उपचाराची एक नवी संधी उपलब्ध झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे ती संगीत विशारद असून तिने लहान वयात हा कोर्स पूर्ण केला आहे तिच्या या यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ. थोरात व कॉलेजच्या संगीत विभाग प्रमुख डॉ. अबोली सुलाखे यांनी तिचे अभिनंदन केले व तिला शुभेच्छा दिल्या.