fbpx

Allu Arjun : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण

कुतूहल न्यूज नेटवर्क

कोरोना विषाणूचा संसर्ग अतिशय झपाट्यानं वाढू लागला आहे. कलाविश्वालाही या संसर्गानं विळख्यात घेतलं आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यानं चाहत्यांना याबाबतची माहिती देत आपल्या प्रकृतीची चिंता न करण्याची विनंती केली. सोबतच आपली प्रकृती लवकरच सुधारेल असा विश्वासही त्यानं व्यक्त केला.

अभिनेता अल्लूने हा संदेश सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिलं, ‘सर्वांना नमस्कार, मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. मी स्वत:ला घरीच क्वारंटाईन केले आहे आणि सर्व प्रोटोकॉलचे अनुसरण करत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना विनंती करतो की, त्यांनी देखील आपापली चाचणी करून घ्यावी. घरी रहा, सुरक्षित रहा आणि जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा लस टोचून घ्या. मी माझ्या सर्व हितचिंतकांना आणि चाहत्यांना विनंती करतो की, काळजी करू नका कारण मी ठीक आहे. ‘

सुपरस्टार अल्लू अर्जुनने ही माहिती देताच त्याचे चाहते खूप काळजीत पडले आहेत. आपल्या लाडक्या कलाकाराच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. त्याला लवकर बरे वाटावे म्हणून त्याचे इंडस्ट्रीमधले मित्र-मंडळी आणि चाहते शुभेच्छा देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *