कुतूहल न्यूज नेटवर्क : इरशाद शेख
रुग्णवाहिकांची चाके चालकांअभावी जागेवर!
पांगरी : ग्रामीण रुग्णालय पांगरी ता.बार्शी येथील रुग्णवाहिका चालकांअभावी एक वर्षापासून जागेवर उभी आहे .रुग्णवाहिका लवकरात लवकर सुरु व्हावी म्हणून कुतूहलचे कार्यकारी संपादक तथा महाराष्ट्र राज्य ग्राहक समितीचे तालुकाध्यक्ष विष्णु पवार यांनी जिल्हा शल्यचिकित्सक अधिकरी यांना निवेदन दिले आहे.
“नॅशनल हेल्थ मिशन योजने अंतर्गत 102 रुग्णवाहिका मागील एक वर्षापासून कंत्राटी वाहन चालक हे पद रिक्त आहे.त्याबाबत मा.जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात दरमहा पाठपुरावा चालू आहे.हे टेक्निकल पद असल्याने याचे अधिकार मा.आयुक्त तथा संचालक मुंबई यांचेकडे असल्याने वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा चालू आहे. ” डॉ.आर.डी.माळी ,प्रभारी वैद्यकीय अधीक्षक ,ग्रामीण रुग्णालय पांगरी ता. बार्शी
पांगरी हे गांव बार्शी तालुक्यातील मोठे गांव आहे शिवाय पुणे -लातूर राज्य रस्त्यावर आहे.पांगरी व परिसरातील लहान मोठी 20 ते 25 गांवे पांगरी ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहेत. बऱ्याच वेळी गरोदर महिला व अपघाती रुग्णांना तातडीने रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे वेळेवर संदर्भ सेवा किंवा उपचार मिळत नाहीत.त्यामुळे त्वरित चालकाची नियुक्ती करावी अशी मागणी विष्णु पवार यांनी केली आहे.