fbpx

बार्शी तालुक्यातील भोयरेत वृद्धास काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी!

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी:
सोयाबीन पेरलेल्या शेतामधून ट्रॅक्टर घेऊन का गेलास असे विचारले असता एका वृद्धास काठीने बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील भोयरे शिवारात घडला. फिर्यादी विलास  पाटील (वय-71वर्ष)  रा. भोयरे ता. बार्शी यांना विजय पाटील यांनी काठीने बेदम मारहाण करून खाली पाडून जीवेठार मारण्याची धमकी दिली. याबात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबात अधिक माहिती अशी कि, फिर्यादी विलास पाटील यांची भोयरेत वडिलोपार्जित शेत जमीन आहे.  शेतात सोयाबीन पेरावयाचे असल्याने ते शेतात काम करूण घेत होते. त्यावेळी त्यांच्या भावकीतील विजय पाटील हा त्याचे शेतातुन फिर्यादीचे शेतात आला. तेंव्हा फिर्यादीने त्यास तु माझे सोयाबीन पेरलेल्या शेतातुन तुझ्या शेतात पेरणीसाठी ट्रॅक्टर का घेवुन गेलास असे म्हणाले असता. तो म्हणाला की मी ट्रॅक्टर तुझ्या शेतातुनच घेवुन जाणार तुला काय करायचे ते कर असे म्हणून  शिवीगाळ करुन  लाथाबुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्याने फिर्यादीस खाली पाडून त्याचे हातातील काठीने उजवे पायाचे नडगीवर तसेच उजवे हाताचे पोटरीवर मारहाण करुन फिर्यादीच्या छातीवर उभा राहुन तुला जिवंत सोडणार नाही. तु आमचे नादी लागु नकोस असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो तेथुन निघुन गेला. याबात बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *