fbpx

Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, पीए संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक

कुतूहल न्यूज नेटवर्क 
मुंबई:
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे (Kundan Shinde) आणि संजीव पालांडे (Sanjeev Palande) यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही कालच चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. काल दिवसभर अनिल देशमुख यांच्या संबंधित ठिकाणी ईडीने झाडाझडती घेतली.

अनिल देशमुख यांच्या नागपूर निवासस्थानी ईडीने काल (शुक्रवार) सकाळपासूनच छापेमारी सुरु केली होती. तब्बल 8 ते 9 तास ही छापेमारी चालली होती. नागपुरातील निवासस्थानी देशमुख कुटुंबियांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर संध्याकाळ ईडीचे अधिकारी काही कागदपत्रांसह घराबाहेर पडले. तर देशमुख यांच्या दोन्ही खासगी स्वीय सहाय्यकांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा ईडीने दोघांनाही अटक केली.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर  सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यामुळे देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून देशमुख यांची केंद्राच्या विविध पथकांकडून चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *