कुतूहल न्यूज नेटवर्क
मुंबई : दयानंद गौडगांव
येत्या १७ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या टी-२० (T20) विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संभाव्य १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र यामध्ये भारतीय संघाचा डावखूरा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याला डच्चू देण्यात आला आहे. तर अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; शिखर धवनला डच्चू
भारतात होणारा टी-२० वर्ल्डकप कोरोनामुळे यूएईत स्थलांतरीत करण्यात आला आहे. २०१६ नंतर पहिल्यांदाच टी-२० वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान ओमान आणि यूएईत खेळली जाणार आहे. यासाठी नुकताच बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे.
असा आहे संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दीक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, ईशान किशन, वरुण चक्रवर्ती हे संघात असतील, तर श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर हे राखीव खेळाडू असतील.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount