पांगरी : पांगरी ता.बार्शी येथील स्व.शोभाताई सोपल इंग्लीश स्कूलच्या प्रांगणात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. प्रथम कार्यक्रमाचे मुख्य अतिथि सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयाचे प्रशांत कानगुडे,सहायक पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, पांगरीचे सरपंच युन्नुस बागवान, केंद्रप्रमुख श्रीहरी गायकवाड, बिभीषण गरड,ममदापूर सरपंच उद्धव घोडके, गोरमाळा सरपंच रविंद्र शिंदे पुरीच्या उपसरपंच दिपाली उपरे, गोरोबा काकडे, अभिजित मुळे,संतोष शिकेतोड,बालाजी खळदकर,गणेश घावटे,किरण मुळे,रवि उन्हाळे ,आबा चौधरी बालाजी घावटे,गोविंद डोके, सविता गिराम, कोमल पाटील, अंजली गरड व इतर मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. नंतर सर्व उपस्थित अतिथी मान्यवरांचे शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून संस्थेच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी प्रशांत कानगुडे यांनी मुलांच्या आक्टिविटी बाबत पालकांना उद्देशून सूचित केले की,शिक्षकाप्रमाणे पालक ही उत्साही व प्रयत्नशील असावे लागतात,तरच मुलांमध्ये क्रिएटिव्हीटी निर्माण होत असते. त्यामुळे शिक्षकाप्रमाणे पालकांनी जागृती राहणे खुप महत्वाचे आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देता तसे त्यांच्या संस्काराकडे व वर्तुणीकडे लक्ष देण्यास शिक्षक व पालक यांना सांगितले. तसेच या शाळेत लहान मुलांना खुप छान पद्धतीने संस्कारांचे धडे दिले जातात,असे मत सचिन हुंदळेकर यांनी व्यक्त केले. तसेच बार्शी तालुक्याचे माजी आ.दिलीपरावजी सोपल यांची ही खास उपस्थिती अचानक लाभली होती. पांगरी सारख्या शेतकरी व कामगार वर्ग जास्त असलेल्या ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाची गरज ओळखून गरड बंधूंनी जे सामाजिक कार्य हाती घेतले ते खुप कैातूकास पात्र आहे त्यांच्या कार्याचे अभिनंदन करून ,पुढील कार्यास शुभेच्छा माजी आ.दिलीप सोपल यांनी दिल्या.शाळेच्या प्रांगणात खुप मोठ्या प्रमाणात पालक वर्ग व प्रेक्षक वर्ग उपस्थित होता. प्रेक्षकांकडून मुलांचे काैतूक होत होते. कार्यक्रमातील खास पैलू कोळी गीत, देशभक्ती गीत, मोठु-पतलू,छोटा भीम, शिव तांडव, विठ्ठल भक्ती, नशिबाचा वडा पाव, शिवरायांचे …दैवत छत्रपती अशी गाणी सादर करण्यात आली. तसेच नाटकामध्ये अंधश्रद्धा, स्वच्छ भारत अभियान व क्रांतीज्योती सावित्रीबाई,जोतिबा फुले जीवन पट हे खुप छान प्रकारे मांडून सामाजिक जागृती करण्यात आली. यावेळी प्रेक्षक, पालक व अतिथीगण शाळेतील लहान कलाकाराला प्रोत्साहन पर टाळ्या व रोख रक्कम इनाम म्हणून देण्यात आले. अशा प्रकारे मुलांच्या कला-गुणांना वाव मिळाला तर नक्कीच त्यातून एक तरी भावी कलाकार घडेल असे प्रतिपादन संस्थाध्यक्ष विनायक गरड यांनी केले. उपस्थित मान्यवर, पालक व प्रेक्षकाचे आभार शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती अवसरे यांनी मानले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका प्रीती अवसरे, सांस्कृ.विभाग प्रमुख पुष्पा गायकवाड, वर्षा गवळी, प्रियंका माने, रमाबाई जाणराव, गौरी देशपांडे, सविता चांदणे, अंजली काळे,राणी पाटील व अनिसा शेख तसेच क्रुष्णा कदम, महेश गरड, संभाजी भोसले, वसंत मोरे, अकबर काझी, शाम काळे व मनोज घुले यांनी परिश्रम घेतले.