पांगरी – ढेंबरेवाडी ता. बार्शी येथील जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद सरपंच गजराबाई उत्तम शिंदे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून पांगरीचे केंद्रप्रमुख श्रीहरी गायकवाड होते, शालेय व्यवस्थान समितीचे अध्यक्ष संतोष काळेल,पत्रकार डी. एम. घावटे सर उपस्थित होते. अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.कार्यक्रमामध्ये बाल कलाकारांनी नाटक,मराठी, हिंदी गीते अशा विविध गीतावर उत्कृष्ट नृत्य अविष्कार सादर केले. उपस्थितांनी टाळ्या वाजवत कलाकारांना प्रोत्साहन दिले त्याच बरोबर ग्रामस्थांनी रोख रुपयांची बक्षिसे दिली .
ढेंबरेवाडी जि प शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप घोळवे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शालन मुंढे, सहशिक्षिका जयश्री नागरगोजे यांनी परिश्रम घेतले. यावेळी आण्णा ढेंबरे, मा. सरपंच धर्मा शिंदे, अर्जुन घोळवे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठया प्रमाणावर उपस्थित होते.