कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : असिफ मुलाणी
सफरचंद म्हटले की काश्मीरची आठवण होते. मात्र, आता आपल्याकडे राज्यातही काही भागात या फळाची लागवड होऊ लागली असून काहींनी याचे उत्पादन घेण्यासही सुरुवात केली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील जागजी गावचे प्रयोगशील शेतकरी राम सावंत यांनी सफरचंदाची लागवड केली आहे. सफरचंद आरोग्यवर्धक असल्याकारणाने याला मोठी मागणी आहे. सावंत याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.