कुतूहल न्यूज नेटवर्क
मयताच्या कुटुंबांना अनुकंपा लागू करा बार्शीतील युवकाने केली मुख्यमंत्र्यांना मागणी
बार्शी : कोरोना व्हायरस (covid- 19)विरुद्धच्या लढाईत अत्यावश्यक सेवा बजावत असताना सन 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ निवृत्तीवेतन योजना व अनुकंपा धोरण लागू करावे अशी मागणी ईमेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रोहन लहू गायकवाड यांनी केली आहे.
सध्या कोरोना व्हायरस महामारीविरुद्ध सर्वजण लढत आहेत. जगासह भारतात व महाराष्ट्रात कोरोना व्हायरस महामारी चे संकट उद्भवले आहे या कोरोना व्हायरस विरुद्धच्या युद्धात आपल्या जीवाची कुटुंबीयांची परवा न करता डॉक्टर, नर्स ,आरोग्य विभागातील कर्मचारी ,पोलीस ,शिक्षक तसेच इतर अनेक विभागातील कर्मचारी लढा देत आहेत. दुर्दैवाने कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत अनेक कर्मचारी मृत झाले आहेत. शासनाच्या सेवेत सन 2005 नंतर नियुक्त झालेले कर्मचारी मृत झाल्यास सदरील कर्मचाऱ्यास जुनी निवृत्तीवेतन योजना व अनुकंपा धोरण लागू नाही. त्यामुळे कोरोना विषाणू विरुद्धची लढाई लढत असताना मृत झालेल्या सन 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना तात्काळ कुटुंब निवृत्तीवेतन योजना व अनुकंपा धोरण लागू करून त्यांच्या कुटुंबियांना त्या कर्मचार्याच्या देशाप्रती प्रामाणिक सेवेची योग्य दखल घेऊन उपकृत करावे असे निवेदनात नमूद केले आहे.