कुतूहल न्यूज नेटवर्क
पुणे: जन हिताय, जन रक्षणाय हे ब्रीद घेऊन, भगवंत सेना दलाच्या माध्यमातून आजपर्यंत अपघातग्रस्तांना मदतकार्य व समाजकार्य करत अल्पवधितच समाजात एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे. भगवंत सेना दलाच्या कार्याची दखल घेऊन, ग्राहक समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ वी जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून भगवंत सेना दल या संघटनेला मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या बार्शी येथील ओन्ली समाजसेवा संघटना व जाणीव फाउंडेशन या संघटनांचा देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
भगवंत सेना दलाच्या कार्याची दखल घेऊन ग्राहक समितीच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी पांगरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते संजय पाटील, मातृभूमी प्रतिष्ठानचे प्रतापराव जगदाळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार काशीद, घारीचे सरपंच प्रशांत जगदाळे, ग्रामसेवक दर्शन मंडलिक, ग्राहक समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दशरथ उकिरडे, प्रा.मस्तुद आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भगवंत सेना दलाचे प्रमुख धिरज शेळके, सेना दलाचे सदस्य शुभम झोंबाडे, रमेश कानडे, स्वप्निल पवार, विजय माने, विनायक गरड यांनी मानपत्र व सन्मान स्वीकारला. यावेळी घारी भागातील ग्रामस्थ, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.