fbpx

बार्शीत ८ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांस मंजुरी; आमदार राजेंद्र राऊत

कुतूहल न्यूज नेटवर्क 
बार्शी:
आरोग्यसेवा आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, यांच्याकडून शासकीय आरोग्य संस्था श्रेणीवर्धन व बांधकामासाठी आशिया विकास बँक यांच्यामार्फत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या निर्मितीसाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. बार्शी तालुक्यातील बोरगाव (खु,) सावरगाव, भोइंजे, पिंपळगाव (पान), झरेगाव, बाभळगाव, सौंदरे, पिंपळगाव (धस) या गावांकरिता नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.

उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम, उपकरणे, यंत्रसामग्री वीज पाणी आदी बाबींचा समावेश आहे. सदरचा निधी आशिया विकास बँकेकडून ७० टक्के तर राज्य शासनाकडून ३० टक्के इतका मंजूर करण्यात आलेला आहे. तालुक्यातील या ८ आरोग्य उपकेंद्राला मंजूर अनुदान प्राप्त करण्यासाठी उपकेंद्राचे अंदाज व आराखडे शासनाकडे सादर करणे क्रमप्राप्त असून, या अंदाज व आराखड्यामध्ये मुख्य इमारत, निवासस्थान, फर्निचर, साहित्यसामग्री, वीज-पाणी कंपाउंड, अंतर्गत रस्ते या सर्व बाबींचा समावेश असावा असे नमूद केलेले आहे. याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना सूचना करण्यात आल्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

यावेळी पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले, माजी जि.प. सदस्य संतोष निंबाळकर, जि.प.सदस्य मदन दराडे, किरण मोरे, समाधान डोईफोडे, प्रमोद वाघमोडे, अविनाश मांजरे, इंद्रजीत चिकणे, राजाभाऊ धोत्रे, सुमंत गोरे, उमेश बारंगुळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *