कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापूर : मॉन्सूनचे केरळमध्ये ३ जूनला आगमन झाल्यानंतर मॉन्सूनने गेल्या दोन दिवसात वेगवान प्रवास करीत महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. नैंऋत्य मोसमी वार्यांच्या अरबी समुद्रातील शाखेने जोरदार मुसंडी मारली आहे. दक्षिण कोकणातील हर्णेपासून सोलापूरपर्यंत मॉन्सूनचे आगमन झाले असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
३ जून रोजी केरळमध्ये आगमनानंतर मॉन्सूनने शुक्रवारपर्यंत कर्नाटकातील कारवारपर्यंत वेगवान वाटचाल केली होती. आज त्यात आणखी प्रगती केली असून गोव्यासह कोकणातील हर्णे तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर व लगतच्या मराठवाड्यातील काही भागापर्यंत मजल मारली आहे.
हवामान विभागाने जाहीर केलेल्या नव्या वेळांनुसार दक्षिण कोकण, ७ जून, कोल्हापूर ९ जूनपर्यंत मॉन्सूनचे आगमन होत असते. यंदा मात्र, मॉन्सून लवकर दाखल झाला असून त्याच्या निर्धारित वेळेपूर्वीच महाराष्ट्रात प्रवेश केला आहे.