कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद: आसिफ मुलाणी
भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांचे निलंबन हे एक सुनियोजित षडयंत्र होते. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी तटस्थपणे दालनातील सत्य सांगावे असे आवाहन भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील ( MLA Ranajagjit Singh Patil) यांनी केले आहे.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी तटस्थपणे दालनातील सत्य सांगावे -आ.राणाजगजितसिंह पाटील
विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसल्यानंतर पक्ष, भूमिका, तत्वे बाजूला पडतात. तटस्थपणे सत्ताधारी, विरोधकांचे मत जाणून घेणे व त्यावर योग्य तो तोडगा काढणे, ही आपली संसदीय प्रणाली आहे. पण पदाची गरीमा व पावित्र्य भंग करण्याचे काम तालिका अधिकारी आ.भास्करराव जाधव (MLA Bhaskar Rao Jadhav) यांनी केले आहे.
अतिशय सरळ विषय चालू होता. आम्ही उपस्थित केलेल्या ओबीसी समाजाबद्दलच्या प्रश्नांचे उत्तर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिले नाही. त्यांच्याकडून जनतेची दिशाभूल करणारे वक्तव्य केले जात होते. अशात विरोधी पक्षाची बाजू मांडण्याची संधीच न देता, रेटुन परस्पर ठराव मंजूर करण्यात आला. याचा सभागृहात झालेला निषेध सर्वांनी पाहिला.
विधानसभा अध्यक्षांच्या दालनातील प्रकार दूर्दैवी होता, पण त्याचे अतिरंजीत व असत्य कथन आ. भास्करराव जाधव यांनी कले. त्यांनी सांगितल्या प्रमाणे अपशब्ध कोणीही वापरले नव्हते. ३ वेळा कामकाज तहकूब करून १२ सहकाऱ्यांच्या निलंबनाचे सुनियोजित षडयंत्र महाविकास आघाडी कडुन करण्यात आले. आपल्या डोळ्यासमोर घडलेल्या या घटनेला विविध रंग दिले गेले. पदाचे पावित्र्य व गरिमा अबाधित राखण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी तटस्थपणे दालनातील वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवावी अशी अपेक्षा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे