बार्शी -गेल्या मंगळवार पासून बेपत्ता असलेले बार्शी कृषी विभागातील कृषी सहाय्यक अंगद सुरेश घुगे (वय ४३ ) यांचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. लऊळ ता माढा येथे झालेल्या खूनातील मृतदेहाची ओळख पटली असून अंगद सुरेश घुगे (वय ४३ ) असे त्यांचे नाव असून ते बार्शी तालुक्यातील भालगांव येथील रहिवासी आहेत.
बार्शीतील कृषी सहाय्यक अंगद घुगे यांचा खून
या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लऊळ ते शिराळ रस्त्यावरील जोशी यांच्या मळयाजवल माळरानावरील रस्त्याचा बाजूला एका खड्ड्यामध्ये झुडपात जळालेली व्यक्ती असल्याची माहिती लऊळचे पोलिस पाटील यांनी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात कळविली होती त्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले होते व त्यांना अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दिसून आला. त्यांच्या शरीरावर हत्याराने वार केल्याच्या खुणा होत्या तसेच डाव्या हाताची तीन बोटे नसल्याचे दिसून आले होते.
पोलिसांनी मृतदेह कोणाचा आहे याचा तपास लावला या घटनेची माहिती समजताच मयत अंगद घुगे यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयात गर्दी केली.खून कोणी व कशासाठी केला याचा तपास पोलिस करत आहेत.