कुतूहल न्यूज नेटवर्क
अथर्व देशपांडेचे एस.एस.सी परीक्षेत नेत्रदिपक यश
पांगरी : सुलाखे हायस्कूल बार्शी येथे इ.10 वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी कु.अथर्व आनंदकुमार देशपांडे याने दहावी परीक्षेत 92% गुण मिळवून नेत्रदिपक यश प्राप्त केले.त्याने 10 वीच्या अभ्यासाबरोबर शास्त्रीय गायनाची मध्यमापूर्ण परीक्षा उत्तीर्ण झाला व तबल्याची प्रवेशिका पूर्ण परीक्षा उत्तीर्ण झाला.त्याने याच वर्षी स्वरचित 15 पंधरा कविता लिहून राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत सहभाग घेतला आहे.तसेच राज्यस्तरीय वक्तृत्वस्पर्धा,चित्रकला व क्रिकेट, बॅडमिंटन आंतरजिल्हा स्पर्धा केल्या आहेत.त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.