आठवणीच प्रेमाचे तिळगुळ,
आठवतो तो संक्रातीचा सण मला
मी पाहत होतो तुला,
चंद्र ताऱ्यांचे अलंकार चढवून
नव्या नवरीसारख नटून
तू माझ्याकडे आली होती.
कविता- आठवणीच प्रेमाचे तिळगुळ, आठवतो तो संक्रातीचा सण मला
आकाश धरती आपल्या मिलनाला पाहत होती,
तू थोडीशी लाजून हाताची मूठ पुढे करून
नजर मिळवली नजरेला,
मी पण हात पुढे केला
“ तिळगुळ घे आता तरी गोड बोल “
असं बोलून तू निघून गेली.
मी मात्र पाहतच राहिलो
मला वाटत नव्हतं तू निघून जाशील,
वाटत होतं प्रेम देशील
मला माहीत आहे
तु कधीच येणार नाही ते.
तरी पण या वेड्या मनाला आज ही वाटतं
तु येसील प्रेमाचे तिळगुळ देण्यासाठी,
गोड गोड बोलण्यासाठी
शेवटी तुझी वाट पाहून पाहून
मन स्वतःलाच म्हणतं आठवणीच प्रेमाचे तिळगुळ
कवी नितीन पाटील
मु .पो.मालवंडी ता. बार्शी जि .सोलापूर
मो. न. ९९२१५१५१९९