fbpx

जनहित शेतकरी संघटनेचे आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांचा वेषांतर करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश

कुतूहल न्यूज नेटवर्क : आसिफ मुलाणी
उस्मानाबाद: ऐंशी टक्के नुकसानी पोटी सोयाबीन पिक विमा द्यावा या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. बुधवारी दि. १० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी पोलिसांना चकवा देत वेषांतर करत बुरखा घालून जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी घोषणा देत बाटली मध्ये सोबत आणलेले डिझेल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ऐंशी टक्के पीकविमा मिळालाच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, विमा कंपनीचे टेंडर रद्द झालेच पाहिजे अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला.

यामध्ये युवा जिल्हाध्यक्ष विनायक ढेंबरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजित डोके, तालुका अध्यक्ष अरविंद पाटील, वैभव डोके, विजयसिंह विधाते, परिक्षीत विधाते, पुष्पराज यादव, तुषार माने, मनोज जाधव, प्रविण डोके, सुधाकर गायकवाड, गजानन लाटे, जगदीश डोके, चंद्रकांत घाडगे, बबलू जाधव, महेश घावटे यांच्यासह शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता.  100 रुपये     200 रुपये     500 रुपये     Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *