fbpx

अतुल आतकरे यांची ग्रा.पं.देगाव (वा) उपसरपंच पदी बिनविरोध निवड

कुतूहलन्यूज नेटवर्क-विजयकुमार मोटे

मोहोळ : देगाव (वा) ता.मोहोळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अतुल आतकरे यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये एकमेव अर्ज आल्याने अतुल आतकरे यांची निवड करण्यात आली. उपसरपंच राजकुमार विजयकुमार पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी (ता. 26) ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच प्रभावती कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीमध्ये उपसरपंचपदासाठी अतुल मधुकर आतकरे यांनी अर्ज दाखल केला होता .

एकमेव अर्ज असल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. यावेळी 11 पैकी 10 सदस्य निवडीस हजर होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक आर.सी.चव्हाण यांनी काम पहिले. या वेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. देगाव (वा.) व परिसरातील ग्रामस्थांनी अतुल आतकरे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. गावाची सर्वसमावेशक विकास कामे करण्यास प्रयत्नशील असून राहिलेली शिल्लक काम पूर्ण करण्यावर भर राहील असे अतुल आतकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *