fbpx

झाडबुके महाविद्यालयात लेखक किसन चव्हाण यांचे विशेष ऑनलाईन व्याख्यान संपन्न

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात मराठी विभाग व मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने लेखक आपल्या भेटील उपक्रमा अंतर्गत आभासी माध्यमाद्वरे ‘मी व माझे आत्मकथन’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. (Author Kisan Chavan’s special online lecture at Jhadbuke College)

विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधताना किसन चव्हाण म्हणाले, आंदकोळ आत्मकथनामधील माझा संघर्ष वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही देशात शोषित, वंचित भटक्या विमुक्तांच्या जीवनातील संघर्ष संपलेला नाही. आजही तो संघर्ष अटळ आहे. त्यामुळे संघर्षासाठी तयार रहा. जीवनातील संघर्षांच्या प्रसंगांना आत्मविश्वासाने सामोरे जा, जो पर्यंत शोषित वंचितांच्या शेवटच्या समाज घटकापर्यंत समता आणि न्यायाची लढाई पोहचत नाही, तो पर्यंत हा लढा निर्भयपणे लढावीच लागेल, असे आवाहान करतानाच, पारंपारिक जात मानसिकता ही समाजामध्ये समता आणि लाकशाहीमुल्ये प्रस्थापित होण्याच्या मार्गामध्ये मोठा अडथाळा ठरत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांच्या आंदकोळ या आत्मकथनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अभ्यासक्रमाध्ये समावेश केल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना, मराठी विभागाचे प्रमुख डॉ. नवनाथ दणाणे यांनी लेखक किसन चव्हान यांच्या लेखनाबद्दल आणि ते करीत असलेल्या शोषित, वंचित भटक्या विमुक्तांच्या न्याय हक्काच्या सामाजिक कार्याबद्दल गौरवोद्गार काढले विद्यार्थ्यांनी किसन चव्हाण यांच्या आंदकोळ या आत्मकथनातील संघर्ष समजून घेतल्यास न्यायासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा आपल्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय रहाणारा नाही असा आशावाद व्यक्त केला.

कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्रा. डॉ. महादेव देशमुख, प्रा. डॉ. हनुमंत मते, प्रा. डॉ. जवाहर मोरे व विद्यार्थी ऑनलाईन सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज गादेकर यांचे मार्गदर्शन लाभले. मराठी विभागाचे प्रमुख व संयोजक प्रा. डॉ. नवनाथ दणाणे, डॉ. विशाल लिंगायत, प्रा. राहूल माने, प्रा. संदीप उबाळे, प्रा. योगिराज घेवारे यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा ऑनलाईन सहभाग लाभला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *